
भोसरीत महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्हI २ डिसेंबर २०२२ I महिलेला अश्लिल हावभाव करत तिचा विनयभंग केला व पुढे माझ्याशी पुन्हा प्रेमसंबंध ठेवले नाही, तर तुला सोडणार नाही अशी धमकी माथेफिरूने दिली आहे. हा प्रकार भोसरी येथे 17 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरून आदिनाथ हरिभाऊ सोमवंशी (वय 26 रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी या काही कामासाठी बाहेर पडल्या तर आरोपी हा फिर्यादीचा पाठलाग करून त्यांनी मैत्रीसाठी विचारणा करत होता. 28 नोव्हेंबर रोजी त्या घरासमोरील ओट्यावर बसल्या असताना आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादीजवळ बोलणवण्यासाठी इशारा केला. फिर्यादी यांनी दुर्लक्ष केले असता आरोपीने घरासमोर येऊन मोठ्याने ओरडत माझ्याशी पुन्हा प्रेमसंबंध ठेव, नाहीतर मी तुला नाही सोडणार अशी धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.