
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारी टोळी जेरबंद
पुणे लाईव्ह I १ डिसेंबर २०२२ Iसोन्यासारख्या महाग किंमतीने विकल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील ४ जणांना अटक केली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बाजारभावाप्रमाणे सुमारे ५ कोटी रुपये किमंतीचे जवळजवळ ५ किलो वजनाची उलटी जप्त करण्यात आली आहे.अक्षय ठाणगे, विजय ठाणगे, अजीम काजी, नवाज कुडपकर, राकेश कोरडे अशी आरोपींची नावे आहेत.पुण्यात ही टोळी एका व्यक्तीला हा पदार्थ देण्यासाठी आले होते.डेक्कन पोलिसांना गोपिनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या ४ जणांना अटक केली आहे.आरोपी हे मूळचे दापोलीचे राहणारे असून पुण्यात हे ते विकण्यासाठी आले होते.नेमका याचा वापर हे पुढे कशासाठी करणार होते याचा तपास पोलीस करत आहेत.