
तरुणाच्या डोक्यात बाटली फोडून केले गळ्यावर वार
पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तरुणाच्या डोक्यात बियरची बाटली फोडत फुटलेल्या बाटलीने गळ्याजवळ वार करून जखमी केले. जखमी तरुणाचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 2) मध्यरात्री देहूरोड येथे घडली.
आदित्य कृष्णा सोनवणे (वय 21, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आदित्य गुरुवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता देहूरोड ब्रिजखाली सिगारेट ओढण्यासाठी थांबले होते. त्यावेळी एका कार मधून दोघेजण आले. त्यांनी विनाकारण आदित्य यांच्या अंगावर बियरची बाटली फेकली. त्याबाबत आदित्य यांनी जाब विचारला असता त्यांच्या डोक्यात आरोपींनी बियरची बाटली फोडली. त्यानंतर फुटलेल्या बाटलीने गळ्याजवळ मारून गंभीर जखमी केले. आदित्य यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आरोपींनी जबरदस्तीने चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.