PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटाच्या भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी या पदाधिका-यांचे स्वागत केले.

थेरगाव येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, जिल्हाप्रमुख राजेश वाबळे, शहरप्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, उपजिल्हा संघटिका शैला पाचपुते, मावळचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, देहू शहरप्रमुख सुनील हगवणे, युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, युवासेना उपशहरप्रमुख माऊली जगताप, राजेंद्र तरस, अंकुश कोळेकर, सय्यद पटेल, महेश कलाल, हेमचंद्र जावळे हे पदाधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, युवा सेनेचे माऊली जगताप यांच्या प्रयत्नातून भरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा इंगळे, शुभांगी सपकाळ, मनीषा पवार, दीपा जोगदंड, प्रगती चौरे, कांचन जगदाळे, अलका भोसले, रूपाली भोसले, दिपाली घाडगे यांच्यासह इतर महिलांनी व शिवसेना विभागप्रमुख संदीप येळवंडे, आशिष सोनवणे, प्रतीक इंगळे, नवनाथ जगदाळे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.