
शेजारी राहणाऱ्या नराधमाने केला चिमुरडीवर अत्याचार
पुणे लाईव्ह I ९ डिसेंबर २०२२ I कामाला जाणाऱ्या आई-वडिलांनी मोठ्या विश्वासाने आपली तीन वर्षाची चिमुरडी सांभाळ करण्यासाठी शेजाऱ्यांकडे सोपवली होती. मात्र, या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केले. पुण्याच्या हडपसर परिसरात 5 डिसेंबर रोजी ही घटना घडली. प्रशांत पडवळ (वय 45) गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरील राज्यातून एक जोडपे हांडेवाडी परिसरातील एका सोसायटीत काही दिवसांपूर्वीच राहण्यासाठी आले होते. नवरा बायको दोघेहीकाम करत असल्याने छोट्या मुलीला ठेवायचे कुठे? हा प्रश्न होता. मोठ्या विश्वासाने शेजारीच राहणाऱ्या पडवळ कुटुंबीयांकडे त्यांनी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला सोपवले होते. मात्र, आरोपी प्रशांत पडवळ याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.