
घरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक
पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iघरामध्ये घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक करून 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त केली आहे.याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोलाराम चौधरी, वय 59 वर्षे, रा. सुदर्शन नगर, साने चौक, आकुर्डी- चिखली रोड, चिखली यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की 8 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता ते दुपारी 3:30 वाजता दरम्यान कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाची कडी उघडून त्या वाटे आत प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटातील तीन लाख रुपये रोख रक्कम चोरी करून नेली होती. याबाबत चिखली पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 454,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा उघड करण्यासंदर्भात वसंतराव बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या तपासकातील सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने व अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
