PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक

पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | विमल, आरएमडी गुटखा साठवणूक प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गुटखा साठवून ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोली मालकावर देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भोईरवाडी येथे करण्यात आली.

मोहनलाल जगाराम चौधरी (वय 42), डोलाराम जगाराम चौधरी (वय 35, दोघे रा. भोईरवाडी, ता. मुळशी) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह खोली मालक एकनाथ नढे (रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोईरवाडी येथे एका खोलीत गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती हिंजवडी पोलीस ठाण्यातील अवैध धंदे प्रतिबंधक पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत एक लाख 91 हजार 439 रुपयांचा विमल आणि आरएमडी गुटखा जप्त केला. मोहनलाल आणि डोलाराम यांना एकनाथ नढे याने त्याची खोली भाड्याने दिली असल्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.