
कुदळवाडी येथे गोवरचे रुग्ण आढळले
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये आकुर्डी रुग्णालय अंतर्गत कुदळवाडी या क्षेत्रातील गोवर आजाराचे 7 पैकी 5 संशयीत रुग्णांचे रक्त तपासणी व घशातील द्रवाचे तपासणी नमुने पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत. या रुग्णांची रक्ततपासणी व घशातील द्रावाची तपासणी मुंबई येथील हाफकिन येथील प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामुळे कुदळवाडी येथे गोवर आजाराचा उद्रेक घोषित करण्यात आला आहे.
यापूर्वी राज्यातील इतर शहरात आजाराचा उद्रेक लक्षात घेता गोवर आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या रहिवास क्षेत्रात महापालिकेमार्फत यापूर्वीच सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.
