PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

व्यावसायिकाची साडे आठ लाखांची फसवणूक

पुणे लाईव्ह I ११ डिसेंबर २०२२ I तरूण व्यावसायिकाला त्याच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना म्हणजे आर्म लायसन्स हवे होते. मात्र हा परवाना मंत्रालयातून मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाने तरुणाची तब्ब्ल साडे आठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार काळेवाडी येथे जानेवारी 2019 ते आजपर्यंत घडला.

याप्रकरणी प्रसाद उर्फ दिगंबर तुकाराम फुगे (वय 27 रा.भोसरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून राज उर्फ धनराज बाळू गायकवाड (वय 30 रा.लोहगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शोती तसेच बीस्कीट व सिगारेट यांचे डिस्ट्रीब्यूटर आहेत. त्यांचा व्यवसाय असल्याने त्यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना हवा होता. त्यासाठी त्यांनी गृह विभाग मुंबई मंत्रालय यांच्याकडे लेखी अर्ज देखील केला होता. यावेळी फिर्यादी यांचा मित्र नितीन भोसले याची ओळख सांगून आरोपी याने फिर्यादीला फोन करून तुमचा अर्ज मी मंजूर करून देतो असे सांगितले. त्याने जानेवारी 2019 पासून ते आजपर्यंत फिर्यादी यांच्याकडे वेळोवेळी असे 8 लाख 63 हजार रुपये घेतले. मात्र परवाना काही दिली नाही. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.