PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यात आंदोलन करणाऱ्या १०० हुन अधिक जणांवर गुन्हा

पुणे लाईव्ह I १३ डिसेंबर २०२२ I राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. 10) चिंचवड येथे दौरा झाला. यावेळी काही जणांनी घोषणाबाजी करीत आंदोलन केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात मारोती भापकर, संतोष निसर्गंध, नीलेश निकाळजे, माऊली बोराडे, शिवशंकर उबाळे, सूर्यकांत अर्जून सरवदे तसेच अधिक 50 ते 60 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मारोती भापकर आणि इतर 50 ते 70 लोकांनी शनिवारी (दि. 10) सायंकाळी सात ते आठ या कालावधीत चिंचवड पोलीस ठाण्यासमोर बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केली.

दुसऱ्या प्रकरणात अनिल लंकाप्पा जाधव,भूषण रानभरे, अभिजित हळदेकर, अविनाशजी सोळुंखे, वसीम इनामदार, सोहेल लांडगे, रवी म्हेत्रे, प्रसन्न मोरे,अजिंक्य हळदेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास महावीर चौक, चिंचवड येथून जात असताना अनिल जाधव आणि इतरांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

तिसऱ्या प्रकरणात सचिन सुरेश भोसले (रा. डांगे चौक, थेरगाव), हरिष बाळकृष्ण नखाते (रा. काळेवाडी), गणेश विजय आहेर (रा. नखाते वस्ती, रहाटणी), कुदरत जबीउल्ला खान (रा. वेताळनगर, चिंचवड), धनू मुरलीधर आल्हाट (रा. मोशी), नीलेश रामदास मुटके (रा. इंद्रायणीनगर, भोसरी), सुधाकर नारायण नलवाडे (रा. काळेवाडी), प्रदीप निवृत्ती साळुंखे (रा. शाहूनगर, चिंचवड), सचिन प्रभाकर साने, अमोल आनंदराव निकम, पांडुरंग दिनकार पाटील (रा. शाहूनगर), अमित श्रीराम शिंदे (रा. निगडी), दिलीप साहेबराव भोंडवे (रा. बिजलीनगर, चिंचवड), प्रवीण धांडेप्पा पाटील (रा. म्हेत्रे वस्ती, चिखली), चेतल गंगाधर वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), युवराज सूर्यभान कोकाटे (रा. अजंठानगर, चिंचोली), शिवाजी नागू कुराडकर (रा. कासारवाडी), किशोर आबा सवाई (रा. दिघी), संतोष धनाजी वाळके (रा. आळंदी रोड, दिघी), किरण ज्ञानेश्वर दळवी (रा. चिंचवडगाव), ओंकार यशवंत विनोदे (रा. विनोदेनगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. 10) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथे जिजाऊ गार्डनसमोर सचिन भोसले आणि इतरांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केली.