PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

मेट्रोच्या रेंजहील येथील कार डेपोचे काम पूर्ण

पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते फुगेवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेच्या ट्रेनच्या मेंटेनंसाठी रेंजहील येथे मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. तसेच रामवाडी ते वनाज या मार्गिकेसाठी कोथरूड हिल व्हिव पार्क (पूर्वीचा कचरा डेपो) या जागेवर मेट्रो कार डेपोची उभारणी करण्यात आली आहे. रेंजहील मेट्रो कार डेपोची सर्व कामे पूर्ण झाली.

रेंज हिल कार डेपो ते रेंज हिल स्थानक अशी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मंगळवारी 5 वाजून 15 मिनिटांनी ट्रेन रेंज हिल डेपो इथून निघाली व 5 वाजून 35 मिनिटांनी ट्रेन सुमारे 1 किलो मीटरचे अंतर पार करून ट्रेन रेंज हिल स्थानकापर्यंत आली. ट्रेनची चाचणी नियोजित उद्दिष्टानुसार व वेळेवर पार पाडली. येत्या काही आठवड्यात रेंज हिल डेपो ते शिवाजीनगर भूमिगत स्थानक व सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे भूमिगत स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात येईल.

रेंज हिल मेट्रोच्या कार डेपोची जागा एकूण 12.1 हेक्टर आहे. या कारडेपोमध्ये मेट्रो प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला नॉन फेअर बॉक्स उत्पन्न मिळणार आहे.