
तृतीयपंथी मदारांसाठी मतदार नोंदणी
पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून तृतीयपंथी समुदायातील मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास समाज कल्याण सहायक आयुक्त संगीता डावखर, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप कदम व निवडणूक विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात तृतीय पंथीय, देह व्यवसायातील स्त्रिया, दिव्यांग, भटक्या व विमुक्त जमाती अशा वंचित घटकांना मतदार नोंदणीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
