
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव 4 वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे 6 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
विक्रम गोखले यांनी गेली पाच दशके केवळ मराठी नव्हे तर हिंदी रंगभूमीही गाजवली. नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ठिकाणी त्यांनी आपल्या उत्कृष्ट भूमिकेने ठसा उमटवला होता. कठोर स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे त्यांना मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आदराचे स्थान होते. त्यांनी ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत शेवटची भूमिका केली. तर मराठीतील ‘अग्निहोत्र’ हि मालिका त्यांची प्रसिद्ध होती. तर हिंदीत ‘हम दिल दे चुके’ या चित्रपटातील एश्व्र्या रायच्या वडिलांची भूमिका त्यांची ओळख बनली हो