
शाईफेक प्रकरणी ३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; ११ जणांचे निलंबन
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील तीन वरिष्ठ पोलीसांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून अकरा पोलीस कर्मच्याऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत रविवारी (दि.11) रात्री पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले.
पिंपरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना विशेष शाखा एक येथे संलग्न करण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्याचा प्रभार पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांच्याकडे देण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिन्द्र पंडित यांना चिंचवड पोलीस ठाण्यात संलग्न करण्यात आले आहे. तर चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना पिंपरी वाहतूक विभागात संलग्न केले आहे. प्रशासकीय व बंदोबस्ताच्या कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात संलग्न करण्यात आले असल्याचे आदेशात म्हटले आहे.पालकमंत्र्यां वरील शाईफेक प्रकरण पोलिसांवर देखील शेकले आहे. या प्रकरणात शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, महिला पोलीस नाईक कांचन घवले, महिला पोलीस शिपाई प्रियांका गुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.
