
चिंचवड येथे तिघांना टोळक्याकडून मारहाण
पुणे लाईव्ह I २८ नोव्हेंबर २०२२ I चिंचवड येथे जुन्या भांडणातून नऊ जणांच्या टोळक्यानी तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि.26) रात्री चिंचवड येथील आनंदनगर च्या मालधक्का येथे घडला.
राजू रमेश चांदणे (वय 30 रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, चन्नाप्पा मरिया गोपरेड्डी (वय 50 ), तेजा उर्फ गणेश मल्लेश गोपरेड्डी (वय 19), दिप्या उर्फ दिपक मल्लेश गोपरेड्डी (वय 21), प्रशांत चंद्रकांत गायकवाड (वय 22) व शिवाजी तानाजी सोलंकर (वय 26) सर्व राहणार चिंचवड यांना पोलिसांनी एटक केले आहे तर गोपाळ गोपरेड्डी,राजा गोपरेड्डी, बाळा कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोबत असलेल्या जुन्या भांडणातून फिर्यादी यांचा भाऊ विजय चांदणे व नातेवाईक रोहीदास हानवते, परमेश्वर हानवते यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली व त्यांना जखमी केले.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
