PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

चासकमान धरण परिसरात दिसला ‘या’ प्रकारचा सरडा

पुणे लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२२ । चासकमान धरण जवळील निसर्गरम्य हिरवागार जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर रंग बदलणारा दुर्मिळ शॅमेलियन सरडा आढळून आला आहे. या परिसरात लोकांना दिवसेंदिवस शॅमेलियन सरड्याच्या संख्येत वाढ झाली असून चासकमान धरण परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर कङूस, वेताळे येथील पर्यावरण निसर्ग मित्र अँड. सुजय जाधव, विशाल भोर, अक्षय बोंबले, प्रमोद काळोखे, मंगेश धंद्रे, गणेश वाळुंज यांना रस्त्यावर फिरताना आढळला.

परिसरात घनदाट झाडी असल्याने परिसरात अनेक जातीचे सरडे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आकर्षक असलेल्या या शॅमेलियन सरड्याला बघण्यासाठी रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या आणेल प्रवाशांनी गर्दी केली. शॅमेलियन वेळेनुसार संकटसमयी आपला रंग बदलत असतो. यामुळे सरड्याला रंग बदलणारा गिरगिट म्हणून देखील ओळखल्या जाते. त्वचेखाली असलेल्या रंगद्रव्यामुळे रंग बदलण्यात माहीर असणारा सरडा आहे. वातावरणातील अनुकूलतेनुसार हा सरडा आपला रंग बदलत असून हिरव्या रंगाचा हा शॅमेलियन सरडा क्वचितच आढळून येतो.

सादर सरड्याला लाभलेली निसर्गदत्त देणगी म्हणजे झाडे, पाने आणि गवताच्या रंगानुरुप तो रंग बदलू शकतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्याचे कारण म्हणजे नैसर्गिक रंगात मिसळून गेल्याने शत्रूपासून संरक्षण करता येते.

शॅमेलियन शक्यतो झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेवटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो. हा सरडा अनेकांनी उत्सुकतेने बघितला. चासकमान धरणाचा परिसर विविधतेने नटलेला असून परिसरात नानाविध प्रजातीचे साप, पशु-पक्षी, विविध फुलपाखरे, सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे यावरून समजते. तसेच परिसरातील डोंगरावर वनौषधीसुद्धा आढळत आहेत.

गिरगिटांना गिर्यारोहण आणि दृश्य शिकारीसाठी अनुकूल केले जाते. त्यांच्या प्रीहेन्साइल शेपटीचा वापर केनोपीमधील फांदीवर असताना ते हलवत असताना किंवा विश्रांती घेत असताना स्थिरता प्रदान करते; यामुळे, त्यांच्या शेपटीला “पाचवे अंग” असे संबोधले जाते. अर्बोरियल असण्यासाठी फायदेशीर असलेले आणखी एक पात्र म्हणजे त्यांचे शरीर किती बाजूने संकुचित होते; त्यांचे वजन शक्य तितक्या समान रीतीने वितरीत करणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे कारण ते झाडांच्या फांद्या आणि फांद्यांना स्थिरता देते. आफ्रिका, मादागास्कर, दक्षिण युरोप आणि श्रीलंकेपर्यंत दक्षिण आशियामध्ये विविध प्रजाती आढळून येत असलेल्या पावसाच्या जंगलापासून ते वाळवंटापर्यंतच्या उबदार अधिवासांमध्ये ते राहतात. त्यांची हवाई, कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा येथे ओळख झाली आहे.