
बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी आयुक्तांच्या निवासासमोर थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I निगडी येथील आण्णा भाऊ साठे बस स्टॉप ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही, म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी बुधवारी (दि.7) थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
हेआंदोलन सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पुकारले असून त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 24 नोव्हेंबर रोजी चिचंवड येथील महापालिकेच्या स्मार्टसिटी कार्यालयाबाहेर या प्रकरणी लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. मात्र, त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी अंतर्गत 15 वर्ष करारनामा करून विनामूल्य जागा देण्यात आली. त्या ठिकाणी रेड झोन एरियामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत बेकायदेशीर बांधकाम करून शौचालय व चार दुकान गाळा बेकायदेशीर बांधकाम करण्यात आले.