
पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको
पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iचाकण वाहतूक कोंडी विरोधी कृती समिती तर्फे गुरुवारी (दि. 15) पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण येथील आंबेठाण चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, आप आदी सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शासनाच्या भूमिकेच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. चाकणमधील आंदोलनाचा इतिहास पाहता पोलिसांनी या भागात खूप मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. रस्त्यांच्या रखडलेल्या कामांच्या बाबत अनेक संतप्त प्रतिक्रिया या आंदोलनात सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या.
मोठ्या संखेने कार्यकर्ते सहभागी झाल्याने सर्व पक्षीय चक्का जाम आंदोलन यशस्वी झाल्याचे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. खेड तालुका कृती समिती दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार असून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे.