
शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ 13 डिसेंबरला पुणे बंद
पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी संघटनांनी आंदोलने केली.
त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात बाल विकास आघाडीसह विविध संघटनेच्या प्रतिनिधीची एक बैठक पार पडली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारंवार होणाऱ्या अपमानाच्या निषेधार्थ येत्या 13 डिसेंबर रोजी पुणे शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भगतसिंग कोषारी यांच्याकडून वारंवार शिवरायांचा अपमान करण्यात आला. कोशारी यांनी हे विधान करून एक महिन्याचा कालावधी लोटला तरी अजूनही त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेतृत्व भगतसिंग कोशारी यांना पाठीशी तर घालत नाही ना असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. याचाच निषेध करण्यासाठी 13 डिसेंबर रोजी पुणे शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुणे शहर बंद मध्ये मुस्लिम संघटनांनी ही पुढाकार (घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में हर मुस्लिम मैदान मे अशी घोषणा देत पुण्यातील तीनशे मशिदीमधून पुणे बंद साठी आवाहन करणार असल्याची माहिती मुस्लिम मुलनिवासी मंचचे अंजुम इनामदार यांनी दिली.