
चोरीप्रकरणाचा पोलिसांकडून ४८ तासात छडा
पुणे लाईव्ह | २६ नोव्हेंबर २०२२ | पेट्रोल पंपावर जमा झालेली सुमारे 9 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची घटना शनिवारी घडली होती. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा, युनिट 1 ने चिखली येथील भोसले पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या या गुन्ह्यांची अवघ्या 48 तासात उकल केली आहे.
20 नोव्हेंबर 2022 रोजी चिखली परिसरातील भोसले ब्रदर्स पेट्रोलियम या पेट्रोल पंपाची दिवस भरात जमा झालेली रोख रक्कम 8,93,136 रुपये ही पेट्रोल पंप बंद झाल्यावर पेट्रोल पंपच्या ऑफिसमधून चोरट्यांनी लंपास केली. रात्री 10.30 वा ते सकाळी 6 वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने लाकडी ड्रॉवर च्या बनावट चावीने लॉकर उघडून रोख रक्कम चोरून नेली होती.
त्यामुळे पेट्रोल पंपचे मालक विशाल भोसले, रा. संभाजीनगर, चिंचवड यांनी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरोधात भा.द.वि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करताना गुन्ह्यातील फिर्यादी यांच्याकडे गुन्ह्याच्या ठिकाणी पेट्रोल पंपावर यापूर्वी काम करणारे इसम व त्यांना ज्यांच्यावर संशय आहे अशा इसमांची बाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी काम सोडून गेलेल्या व त्यांना संशय असलेल्या इसमाबाबत माहिती दिली.