PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पीएमपीकडून १९ मार्गांवर महिलांसाठी सोडणार बस

पुणे लाईव्ह I २७ नोव्हेंबर २०२२ I गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता आता 19 मार्गांवर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 28) पासून या ज्यादा गाड्या शहरातील गर्दीच्या मार्गावर फक्त महिलांकरिता धावतील. महिलांना बसमधून सुरक्षित प्रवास करता यावा, त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करणे सोपे होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आता पीएमपीच्या 24 बस ही सेवा पुरवतील.
महिला विशेष बसचे 19 मार्ग…
स्वारगेट ते येवलेवाडी
स्वारगेट ते हडपसर
अ.ब.चौक ते सांगवी
मनपा भवन ते लोहगाव
कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी
कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
कात्रज ते कोथरूड डेपो
हडपसर ते वारजे-माळवाडी
भेकराईनगर ते मनपा भवन
हडपसर ते वाघोली (केसनंद)
अप्पर डेपो ते स्वारगेट
अप्पर डेपो ते पुणे स्टेशन
पुणे स्टेशन ते लोहगाव
मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
निगडी ते पुणे स्टेशन (औंधमार्गे)
निगडी ते भोसरी
निगडी ते हिंजवडी माण फेज 3
चिंचवडगाव ते भोसरी
चिखली ते डांगे चौक