PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यात गुलाबी थंडी ; पारा घसरला

पुणे लाईव्ह I ४ डिसेंबर २०२२ I आठवड्याभरापुर्वीच गायब झालेली थंडी आता जोमाने परतली आहे.शिवाजीनगर परिसरात रात्रीचे तापमान बुधवारी 14.3 अंशांवरून शुक्रवारी 11.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकर दिवसा ऊन आणि रात्री गुलाबी थंडी अनुभवत आहेत.

 

4 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे. आठवडाभर तरी शहरात कडाक्याची थंडी कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शुक्रवारी पाषाण येथे रात्रीचे तापमान 11 अंश सेल्सिअस, चिंचवड येथे 16.7 अंश सेल्सिअस, लवळे येथे 17.5 अंश सेल्सिअस, मगरपट्टा येथे 17.4 अंश सेल्सिअस होते. तर शुक्रवारी शहरात दिवसाचे तापमान 31.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले म्हणजे नेहमीपेक्षा 1.9 अंश सेल्सिअस जास्त आणि रात्रीचे तापमान शुक्रवारी सामान्यपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस थंड होते. परिणामी, पहाटे आणि सकाळीही बोचरे वारे वाहात होते. शिवाजीनगर, पाषाण आदी परिसरात कडाक्याची थंडी पडत असून, लोहगाव, चिंचवड आणि मगरपट्ट्यात तुलनेने कमी कडाका जाणवत आहे. पुढील तीन दिवस तरी आकाश मुख्यतः निरभ्र राहील तर पहाटे आणि रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी कायम राहणार आहे.

दिवसाचे तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शहरात थंड हवामान असेल.