PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादीचे शिबीर

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I आगामी पालिका निवडणुकांच्या तयारीसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी (11 डिसेंबर) ‘विचार वेध कार्यकर्ता प्रबोधन शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन मंगल कार्लयालयात हे शिबीर होणार आहे. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने शिबिराचा समारोप होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाऊसाहेब भोईर, कविता आल्हाट, रविकांत वरपे, राहुल भोसले, नाना काटे ,शहर प्रवक्ते तथा मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, सुनील गव्हाणे, रविकांत वर्पे, फजल शेख, विधानसभा अध्यक्ष शाम लांडे, पंकज भालेकर, इम्रान शेख, वर्षा जगताप, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, गीता मंचरकर, माजी महापौर वैशाली घोडेकर इत्यादी मान्यवर व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.