PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

कलापिनी तर्फे नाट्य छटा स्पर्धां उत्साहात

पुणे लाईव्ह I ८ डिसेंबर २०२२ I  कलापिनी तर्फे दरवर्षी विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यातील नाट्य छटा स्पर्धांच्या आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष होते. जवळपास 200 स्पर्धकांनी या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.

5 वर्ष ते 75 वर्ष अशा सर्व वयोगटातील स्पर्धक यात सहभागी होते. प्राथमिक गटासाठी डॉ.ऋचा पोंक्षे आणि मीरा भरड यांनी परीक्षण केले. तर, माध्यमिक आणि खुल्या गटासाठी डॉ.ऋचा पोंक्षे यांच्या बरोबर शोभा जोशी आणि सागर यादव यांनी परीक्षण केले.

दोन्हीही स्पर्धांचे सूत्रसंचालन नीता धोपटे, ज्योती ढमाले, केतकी लिमये, मीरा कोंहुर यांनी केले. तर, बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन आरती पॉलावर आणि अनघा कुलकर्णी यांनी केले. बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्यावसायिक ऋषिकेश कुलकर्णी आणि गंगाराम गीते तसेच वैजयंती गीते हे उपस्थित होते.