
टीसी म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष ; दोघांना १४ लाखांचा गंडा
पुणे लाईव्ह I ३० नोव्हेंबर २०२२ I मागील काही दिवसांपासून नोकरीच्या अमिषाने तरुणांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यात आता टीसी म्हणून नोकरी लावून देण्याच्या अमिषाने पुण्यातील दोन तरुणांची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याचं समोर आले आहे.
राजकुमार कांबळे (55) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सुभाष चंद्र कटोच असे या आरोपीचे नाव आहे. 2018 पासून आरोपीने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांची आरोपी कटोच याच्याशी ओळख एका मध्यास्थाच्या माध्यमातून झाली होती.
फिर्यादी यांच्या मुलीला क्लार्क तर पुतण्याला रेल्वे मध्ये टी सी (तिकीट चेकर ची) ची नोकरी लावून देतो असे आश्वासन कटोच याने दिले होते.
