
अखेर चासकमान धरण भरल्याने शिरूरचा पाणी प्रश्न मिटला !
पुणे लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । चासकमान धरण शंभर टक्के भरल्याने खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न आता पूर्ण पने मिटला आहे. सध्या चासकमान धरणात १००% पाणी साठा असून पाणीपातळी ६४९.५३ मीटर आहे तसेच एकूण साठा २४१.69 दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त साठा २१४.५० दशलक्ष घनमीटर आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. परिसरातील ओढे – नाले भरभरून वाहत आहेत.
धरणात पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासांत २ मिलिमीटर तर १ जूनपासून ९४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी (दि. २३ सप्टेंबर) दुपारी चार वाजता सांडव्यादवारे ५५५ क्युसेक विसर्ग बंद करण्यात आला. विद्युत जनरेटरची दुरुस्ती झालेने विद्युत विमोचकाद्वारे 550 क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.