
तळेगाव दाभाडे येथे रविवारी नेत्ररोग तपासणी शिबीर
पुणे लाईव्ह | २५ नोव्हेंबर २०२२ | रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व उडान फाउंडेशन (पुणे) यांच्या वतीने नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. २७) सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे हे शिबिर होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक विलास काळोखे व उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री ठाकूर यांनी दिली. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे रविवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत होणार आहे. या नियोजित शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या शुभहस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अध्यक्ष नितीन मराठे भूषविणार आहेत. यावेळी मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्राचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले व डॉ. राजेश मेहता यांची उपस्थिती लाभणार आहे.