
मृत जनावरांचे पुण्यातील विद्युत दाहिनीत होणार दहन
पुणे लाईव्ह I ७ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड शहरातील गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, घोडा, गाढव आदी मोठ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांचे दहन करण्याची व्यवस्था शहरात नाही. त्यामुळे शहरातील मृत जनावारांचे दहन करण्यासाठी पुणे महापालिकेच्या विद्युत दाहिनीत पाठविण्यात येणार आहेत. यासाठी दर महिन्याला चार लाखांचा खर्च पालिकेला करावा लागणार आहे.
दरम्यान, शहरात दर महिन्याला साधारण 40 मोठी जनावरे मृत होतात.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मृत पावलेली मोठी जनावरे उचलणे आणि विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने निविदा प्रसिद्ध केली होती. शहरातील मृत जनावरे पुण्यातील नायडू पॉन्ड येथील पालिकेच्या विद्युत दाहिनीत दहन करण्यात येणार आहेत. यासाठी मे. दिल्लीवाला ऍन्ड सन्स, पुणे यांनी हे कामकाज करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मनुष्यबळ वाहन भाडे, वाहन इंधन खर्च असे एका महिन्याला 2 लाख 61 हजार 753 रूपये तर अतिरिक्त कामकाजास 553 रूपये प्रति फेरी दराने मे. दिल्लीवाला ऍन्ड सन्स यांना देण्यात येणार आहेत.
