PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

 चिखली आणि मोशी परिसरात घरफोडी ; ४ लाखांचा  ऐवज लंपास

पुणे लाईव्ह  I २३ डिसेंबर २०२२ I चिखली आणि मोशी परिसरात घरफोडीच्या दोन घटना गुरुवारी (दि. 23) उघडकीस आल्या. दोन्ही घटनांमध्ये तीन लाख 98 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात 33 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. 23 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर या कालावधीत महिलेच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 13 हजार रुपये किमतीचे 56.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात संदेश भगवान गावडे (वय 30, रा. मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. 21) सकाळी सहा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत गावडे हे घराला कुलूप लावून कामाला गेले होते. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे लॅच लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातून कपाटाच्या लॉकर मधून दोन लाख 82 हजार रुपये किमतीचे 9.4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन हजारांचे चांदीचे पैंजण असा दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला.