
किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांची मारहाण
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I पानटपरी जवळ पान खात उभे असताना किरकोळ कारणावरून तरुणाला तिघांनी मारहाण केली आहे. हा प्रकार पिंपरीतील मिलींदनगर येथे रविवारी (दि.4) रात्री घडला.
याप्रकरणी करणसिंग चरणसिंग टाक (वय 19 रा.पिंपरी) याने पिपंरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून किरण डोंगरे (वय 17), विशाल घोडके (वय 18) प्रशांत डिगे (वय 27) सर्व राहणार मिलींदनगर, पिंपरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
