PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

एटीएम कार्ड चोरून पावणेदोन लाख काढले ; गुन्हा दाखल

पुणे लाईव्ह I ३ डिसेंबर २०२२ I घरातून एटीएम कार्ड चोरून नेले. एटीएमद्वारे हिंजवडी आणि नांदेड येथून 1 लाख 72 हजार रुपये काढून घेतले. ही घटना 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पंचरत्न चौक, हिंजवडी येथे घडली.

तेजस विठ्ठल मुंढे (वय 30, रा. हिंजवडी, मूळ रा. नांदेड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि.2) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजस हे हिंजवडी येथे भाड्याने राहतात. त्यांच्या खोलीत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने पाकिटातून एटीएम कार्ड चोरून नेले. त्या एटीएमच्या आधारे हिंजवडी आणि नांदेड येथील एटीएम सेंटरमधून 1 लाख 72 हजार रुपये काढले. याबाबत तेजस यांना त्यांच्या शेजारी राहणारा श्रीकांत नरुडे याच्यावर संशय आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत. एटीएम कार्ड चोरीला गेले किंवा हरवले असता त्वरीत बँकेशी संपर्कसाधून कार्ड ब्लॉक करावे असे आवहान पोलिसांनी केले आहे.