PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

दोन चिमुरडयांचे अपहरण करताना महिलेला अटक

एका 5 वर्षीय मुलाचे व 3 वर्षीय मुलीचे अपहरण करत असताना आरोपी महिलेस तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. तिच्या विरोधात भादवि कलम 363, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 4 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गणपती चौक ते घोरवडी स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर घडली. महिला आरोपी फिर्यादीची 3 वर्षांची मुलगी तसेच फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्या महिलेचा 5 वर्षांचा मुलगा या दोघांना फुस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लगेचच या आरोपीला अटक करून दोन्ही लहान मुलांचे प्राण वाचवले.