
चिखलीत वाहने जाळली ; गुन्हा दाखल
पुणे लाईव्ह I २६ डिसेंबर २०२२ I चिखलीतील जाधववाडी परिसरात एक दुचाकी व रिक्षा जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. तर दोन ते तीन दुचाकी व चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. ही घटना 24 डिसेंबर रोजी घडली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती देताना, चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गुमाणे म्हणाले की, अनिल रत्ने, रा. जाधववाडी, चिखली यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व इतरांनी त्यांच्या घराजवळ रात्री वाहने पार्क केली होती. आज मध्यरात्री 12.30 वा च्या सुमारास वाहनांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या दुचाकीला व एका रिक्षेला आग लागली होती. तसेच 2 ते 3 दुचाकी व चार चाकी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
