
वाघोलीत ट्रकला भीषण आग
पुणे लाईव्ह I २९ डिसेंबर २०२२ I वाघोली येथील कावडे वस्ती परिसरात एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना आज 29 डिसेंबरला सकाळी 8.30 वा. सुमारास घडली.पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.
प्राथमिक माहिती नुसार आज सकाळी 8.30 च्या सुमारास वाघोली येथील कावडे वस्ती येथे ट्रक ला आग लागली होती पीएमआरडीए अग्निशमन केंद्रातील अग्निशमन गाड्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझवली. तातडीने मदद मिळाल्यामुळे बाजूला असलेले गोडाऊन सुरक्षित राहिले. केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक- नितीन माने, फायरमन- चेतन खमसे, अक्षय नेवसे, विकास पालवे या अग्निशमन जवानांनी आग विझवली आहे.