
कत्तलीसाठी गायी नेणाऱ्या तिघांना अटक
पुणे लाईव्ह I ६ डिसेंबर २०२२ I कत्तलीसाठी निर्दयीपणे गाय घेऊन जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) वडमुखवाडी येथे घडला आहे.
याप्रकऱणी पोलीस नाईक अनिल रामचंद्र शिंदे (वय 35) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी लक्ष्मण सुरुदेव गायकवाड (वय 38 रा.मोशी), संदिप पंढरीनाथ तापकीर (रा.चऱ्होली) रामेश्वर भगवान फुले (वय 41 रा.चऱ्होली) यांना अटक केली असून शाबीर कुरेशी (रा. पिंपरी) हा अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर याने त्याची गाय 9 हजार 500 रुपयांना लक्ष्मण याला विकली, त्याने ती त्याचा दोस्त रामेश्वर फुले याच्या टेम्पोमध्ये (एमएच 14 सीपी 8072) जनावर वाहतूकीचा कोणताही परवाना नसताना गाडीमध्ये बांधून ती कत्तलीसाठी पाठवली. यावेळी तिला चारा पाणी न देता तिचे हाल केले. ती पुढे शाबीर याच्याकडे कत्तलीसाठी पाठवली जात होती. यावोळी पोलिसांनी वडमुखवाडी येथून तिला ताब्यात घेतले. आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम केल्याप्रकरणी सामान्य नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कारवाईचा बडगा उगारला आहे, तर दुसरीकडे स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन रेड झोन एरियामध्ये बेकादेशीर बांधकाम प्रकरणी पाठबळ देत आहे, असा आरोप काळभोर यांनी केला असून याविरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या निवासस्थानी बुधवारी थाळीनाद आंदोलन करुन आयुक्तांना चप्पल बूट हार भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती सचिन काळभोर यांनी दिली आहे.