
रावेत येथे वासरू चोरणाऱ्या तिघांना अटक
पुणे लाईव्ह । १ जानेवारी २०२३ ।मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे.
कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार हर्षद कुरेशी (रा. खराळवाडी, पिंपरी) तसेच त्यांना मदत करणारा रिक्षा चालक कादर सय्यद यांना पोलीस नाईक अमोल खुडे यांनी मोठ्या शिताफीने अटक केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुडे हे विकासनगर येथे सकाळी साडे सात वाजता मॉर्निंग वॉकला जात होते. रावेत येथील बी आर टी रोड जवळील क्वीन्स टॉवर जवळ आले असता. त्यांना एक रिक्षा जोरात वेगाने जात असलेली दिसली. त्यांना संशय आल्याने त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात कळवले. त्यानंतर लगेच पोलीस टिम आली व त्यांनी रिक्षा पकडली. यावेळी रिक्षात वासरू नेत असल्याचे दिसले.
मी आकुर्डी येथील गणेश तलाव येथे मॉर्निंग वॉक करायला जात असतो. नेहमी प्रमाणे आज माझ्या मोटर सायकलवरून तिकडे जात होतो. त्यावेळेस सांगवी-किवळे बी आर टी रोड वर क्वीन्स टॉवर जवळ सकाळी 7.15 वा च्या सुमारास एक अति वेगाने रिक्षा जाताना दिसली. मला संशय आल्याने मी पोलीस कंट्रोल रूमला कळवले. माझी दुचाकी आडवी घालून रिक्षा थांबवली. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी तेथे आले. रिक्षा चालक व इतर दोन तरुण वासरू घेऊन जात होते. त्यांना पोलीस ठाण्यात नेले आहे.”
पोलिसांनी 3 युवकांना ताब्यात घेतले असून रावेत पोलीस ठाण्यात चौकशी चालू आहे.