
चिंचवड व भोसरी परिसरात रिक्षांची चोरी
पुणे लाईव्ह I १५ डिसेंबर २०२२ Iचिंचवड व भोसरी परिसरात रिक्षा चोरीची घटना घडली आहे. येथून रिक्षा चोरण्यात आली आहे. या दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुधीर दरेकर, वय 45 वर्षे, रा. साईबाबा नगर मारुती मंदिराच्या बाजूला, चिंचवड यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वि कलम 379 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
