
पीएमपी चालकला मारहाण करणाऱ्या तरुणाला घेतले ताब्यात
पुणे लाईव्ह I २० डिसेंबर २०२२ I प्रवासी उतरत असताना (मध्येच चढणाऱ्या एका प्रवाशाला रोखल्याने त्याने पीएमपी चालकाला मारहाण केली. हडपसर येथे 18 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी चालक मारुती बाळू सांगळे (वय 39) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार शिवराज साळुंखे (वय 30) यांच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी हे पीएमपी चालक आहेत. इंडिया गेट ते हडपसर अशी फेरी करून ते हडपसर येथे आले होते. यावेळी स्टॉपवर प्रवासी उतरत असताना आरोपी शिवराज साळुंखे हा मध्येच बसमध्ये चढत होता. यावेळी फिर्यादी यांनी त्याला मध्येच चढू नका असे सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपीने “मी सुद्धा पूर्वी पीएमटी ड्रायव्हर म्हणून काम केले आहे, मला शिकवतो का बस मध्ये कसे चढायचे ते” असे म्हणत शिविगाळ केली आणि मारहाण केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.