
वेंडर कंपनीच्या कामगारांनी डिलीव्हरीसाठी आलेले मोबाईल चोरले
पुणे लाईव्ह I १७ डिसेंबर २०२२ I वेंडर कंपनीच्या कामगारांनी डिलीव्हरीसाठी आलेले 6 मोबाईल व एक हेड फोन चोरून नेला आहे. ही चोरी म्हाळुंगे येथील अमेझॉन सेलर सर्व्हिस कंपनीच्या लोडिंग अँन्ड स्टेजिंग डॉकमध्ये घडली असून हा प्रकार 10 डिसेंबर रोजी उघडकीस आला.
या प्रकऱणी पंकज बाबुराव धोत्रे (वय 40) यांनी फिर्याद दिली असून चाकण पोलीस ठाण्यात अवधुत गारगोटे, आदित्य वालटकर, विशाल जाधव यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे वेंडर कंपनीचे कामगार असून त्यांनी माल उतरवून तो स्टोअर करत असताना शिपमेंटमधून 77 हजार 193 रुपयांचे 6 मोबाईल व 1 हेडफोन चोरले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
