
कोयता गँगची दहशत वाढली ; दोघांवर प्राणघातक हल्ला
पुणे लाईव्ह I २४ डिसेंबर २०२२ I पुण्यात कोयत्याने हाणामारी करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. हडपसर, सिंहगड, खडकी या परिसरात कोयता गँगनेदहशत पसरवण्याच्या घटना ताज्या असतानाच पुण्याच्या भरवस्तीत देखील असाच प्रकार घडला. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडे पेठेत सात ते आठ जणांच्या टोळक्याने पाठलाग करून दोघांवर कोयत्याने वार केले. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले. 22 डिसेंबर रोजी हा प्रकार घडला.
योगेश दत्तात्रय चव्हाण (वय 38), सूरज संतोष कोल्हे (वय 19), मुकेश इंद्रजीत उंबरे (वय 19), विशाल अंकुश मुजमुले (वय 19) यांच्यासह आणखी तिघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमकार महेश थोरात (वय 22) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
