PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्याला अटक

पुणे लाईव्ह I २५ डिसेंबर २०२२ Iमुलीचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करणाऱ्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी उस्मानाबाद येथून अटक केली आहे.
संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सितापे (वय 19 रा. आवसा, लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, आरोपी याने पीडित मुलीशी इंन्स्टाग्रामवरून ओळख वाढवली, पीडितेला आरोपीने मेसेजवरून भेटायला बोलावले. तिथे त्याने पीडितेशी जबरदस्ती करत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले, तसेच पीडितेच्या नकळत तिचे अश्लिल फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर व पीडितेच्या काकाच्या व्हॉटसअपवर व्हायरल केले.