PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

तरुणीची पाठलाग करून काढली छेड ; रोमिओवर गुन्हा

पुणे लाईव्ह I २ डिसेंबर २०२२ I तरुणीचा पाठलाग करत तिची छेड काढली व पोलीसात तक्रार दिली तर सोडणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.1) सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे घडला.
याप्रकरणी पिंपरी पोलीसात 18 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली असून मंगेश अच्युत राऊत (रा.भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा पाठलाग करून आरोपीने फिर्यादीचा हात धरला तिच्याशी गैरवर्तन केले. यावेळी फिर्यादीने त्याला विरोध केला असता तू पोलीस कम्प्लेंट करायची नाही, तुला सोडणार नाही, पोलीस माझ काही नाही करू शकत अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस (Pimpri) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.