
आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार
पुणे लाईव्ह । ६ जानेवारी २०२३ । आळंदीमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी उद्धव कांबळे (वय 48 वर्षे, रा. पद्मावती रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाकर सूर्यवंशी व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश पाटील म्हणाले, की फिर्यादी हे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या महादेव गवळी यांच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले, की एका महिला त्या घरातील लोकांना छोट्या ग्लासमधून लाल रंगाचे द्रव्य हे येशूचे रक्त असल्याचे सांगत होती व त्यांना ते प्यायला सांगत होती. अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे. तसेच, धर्म परिवर्तनाबाबत विचारले असता, त्याबाबत आमची चौकशी सुरु आहे असे त्यांनी सांगितले.