
सात जणांनी मिळून केली दोघांना बेदम मारहाण
पुणे लाईव्ह । ४ जानेवारी २०२३ ।मोबाईल चोरीचा आरोप का केला? अशी विचारणा करत सात जणांनी मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी सायंकाळी कुदळवाडी येथील श्रीराम इन कॉरपरेटेड नावाच्या लाकडी गोडाऊनमध्ये घडली.राम गोपाल गौतम, राम शिनगारे गुप्ता अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश श्रीराम शहा (वय 47, रा. खडकी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ज्ञानोबा बाबासाहेब घिगे व इतर सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचे कुदळवाडी येथे लाकडी गोडाऊन आहे. गोडाऊनमध्ये येऊन आरोपींनी राम गोपाल गौतम यांना, तू माझ्यावर मोबाईल चोरीचा आरोप कसा काय केला, असे म्हणत मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या राम शिनगारे गुप्ता यांना देखील आरोपींनी मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.