PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढणार – रुपाली ठोंबरे

पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदार संघातील जागेवर निवडणूक कोण लढवणार याच्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मात्र पक्षाने आदेश दिला तर आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

रूपाली ठोंबरे म्हणाल्या, 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी मुक्ता टिळक आजारी होत्या. त्यावेळी माझे तिकीट याच कारणावरून कापण्यात आले होते. आजारी असतानाही मुक्त टिळक यांनी शक्य होईल तेवढं काम केलं आहे. मात्र असं असलं तरीही कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे झालीच नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आता निवडणूक लागल्यास काम करणारा माणूस निवडून आला पाहिजे. पक्षाने आदेश दिला तर मी ही निवडणूक नक्की लढवेल असेही ठोंबरे म्हणाले.