
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांचा संप
पुणे लाईव्ह I १२ डिसेंबर २०२२ I खासगी कंपन्यांची दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद व्हावी यासाठी रिक्षा संघटनांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी (दि.12) बंद पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांना आजही हाल सहन करावे लागणार आहेत.
यासाठी चक्का जाम आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षाचालकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुण्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत बंद पुकारला होता.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. दुचाकीवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी पुण्यातील काही रिक्षा संघटनांकडून आज रिक्षा बंद आंदोलन पुकारण्यात आला आहे.
