
राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद
पुणे लाईव्ह I २२ डिसेंबर २०२२ I महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र काढत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. “थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा” अशा स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. राज ठाकरे यांचा हा रोख कोणाकडे आहे? हा प्रश्न आता सर्वांनाच पडला.
मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आप्पा आखाडे यांना पद देण्याची मागणी केली होती. इतकेच नाही, तर यापूर्वी अनेकदा मोरे यांनी आपली नाराजी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी एक पत्रक काढूनच पक्षातील पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे.