
हिंजवडी येथे स्पा सेंटरवर छापा ; मालक व मॅनेजरला अटक
पुणे लाईव्ह I १९ डिसेंबर २०२२ I पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.17) हिंजवडी येथील व्हाईट स्क्वेअर मधील स्पा सेंटरवर छापा मारला आहे. यामध्ये काही पीडित महिलांचीही सुटका कऱण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी स्पा मालक अजित शंकर गोसावी (वय 48, रा.धायरी), स्पा मॅनेजर सोनुकुमार विंद्याचल कनोजीया (वय 22 रा. वारजे माळवडी, मुळ उत्तरप्रदेश) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिंजवडी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या स्पा सेंटरवर छापा मारला.
यावेळी त्यांनी तेथील पीडित महिलांची सुटका करत दोन आरोपींना ताब्यात घेतले व घटनास्थळावरून दोन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 37 हजार 920 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकऱणी आरोपींवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
