
वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पुणे लाईव्ह I २७ डिसेंबर २०२२ I मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस महाराज) यांच्या हस्ते प्रकाशन झाले. श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे सोमवारी हा प्रकाशन सोहळा पार पडला. मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ सातत्याने राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी कौतुक केले.
दिनदर्शिकेचे प्रकाशन गुरूवर्य स्वामी निरंजनानंद सरस्वती( परमहंस महाराज) यांच्या शुभहस्ते व ह.भ.प. डॉ. स्वातीताई वेदक( प्रोजेक्ट मॅनेजर, श्री साईबाबा सेवाधाम), ह.भ.प. एकनाथ श्रीराम शेटे(मा. उपसरपंच, नवलाख उंबरे),भारत लक्ष्मण काळे( अध्यक्ष पत्रकार संघ मावळ तालुका), सुवर्णाताई संतोष कुंभार( मा. सभापती, पं स मावळ), ह.भ.प. शिवाजी पवार, ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे( अध्यक्ष), भरत येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, माता भगिनी व वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.