PuneLiveNews
Pune Live | Latest Pune News Updates | पुणे बातम्या

पुण्यातील मोबाईल टॉवरचा 18 कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत

पुणे लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I नागरिकांनी कर न भरल्यास त्यांच्यावर पुणे महापालिकेकडून कारवाई केली जाते. एखाद्याच्या मोबाईलमध्ये बसवलेल्या कंपनीच्या सिमची वैधता संपली, तर ते सिम तात्काळ निष्क्रिय केले जाते, परंतु, शहरात सुमारे 2,900 मोबाइल टॉवर बसवले आहेत. या वर्षातील कर थकबाकीचा आकडा 18 कोटींचा असून महापालिका ही थकबाकी कधी वसूल करणार? की या मोबाईल कंपन्यांना थारा देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एका इंग्रजी न्यूज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विविध कंपन्यांचे 2 हजार 900 हून अधिक मोबाईल टॉवर लावण्यात आले आहेत. या मोबाईल टॉवरमधून 2021-22 या वर्षाचा मालमत्ता कर 91 कोटी रुपयांचा भरण्यात आला आहे, तर सुमारे 18 कोटी रुपयांचा मालमत्ता कर या कंपन्यांनी अद्याप भरला नसल्याची वस्तुस्थिती आरटीआय कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी उघड केली आहे.

नागरिकांनी मालमत्ता कर न भरल्यास त्यांच्यावर पीएमसीकडून कारवाई केली जाते. या मोबाईल कंपन्यांकडून लवकरात लवकर कर वसूल करून त्याचा शहराच्या विकासकामांसाठी वापर करावा, अशी मागणी घोलप यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.